माझी वसुंधरा ६.० ग्रामपंचायत इंदोरी ता.मावळ जि.पुणे*दिनांक- 20/9/2025

🌿तत्वाचे नाव-भूमी तत्व

🌿उपक्रम नाव-जागतिक स्वच्छता दिवस साजरा करणे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदोरी तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छता मोहीम घेण्यात आल्या.

जागतिक स्वच्छता दिवस* या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देणे. स्वच्छता ही केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नव्हे तर मानसिक स्वास्थ्यासाठीही महत्त्वाची असते.

आजच्या काळात वाढत्या शहरीकरणामुळे आणि कचरा व्यवस्थापनाच्या अभावामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

प्लास्टिकमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आणि पुनर्वापराच्या सवयींना प्रोत्साहन देण्यासाठी देखील या दिवशी विशेष उपक्रम हाती घेतले जातात.

सर्वांनी मिळून स्वच्छतेची जबाबदारी घेऊया पर्यावरण आणि समाज हे दोन्ही सुदृढ बनवूया.

#MajhiVasundharaAbhiyan6#Epledge#missionLife#indorigrampanchyat#climateaction#climatechange#cleanandgreenvillage#swacchatahiseva#swachhbharatabhiyan#savetheplanet#nopolluction#gogreen🌴*

• ⁠*स्वच्छ,सुंदर,हरित इंदोरी*🌴

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top